स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची गैरसोय की तांत्रिक प्रक्रिया? चौकशीची नागरिकांची मागणी. फलटण (जि. सातारा): फलटण शहर व तालुक्यात बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत अनेक ग्राहकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, महिन्याच्या नियोजित मुदतीपूर्वीच वीजबिल तयार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमके बिल कोणत्या कालावधीचे आहे, मीटर रीडिंग कधी घेतले जाते आणि बिल मुदतीपूर्वी कसे तयार होते, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काही ग्राहकांचा दावा आहे की, पूर्वी महिनाभराच्या वापरानंतर येणारे वीजबिल आता मुदतीपूर्वीच उपलब्ध होत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचण आहे का, की ही नियमित बिलिंग प्रक्रिया आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. […]
फलटणमध्ये स्मार्ट मीटरचा घोळ? मुदतीपूर्वीच वीजबिल कसे तयार होते, नागरिकांमध्ये संभ्रम
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची गैरसोय की तांत्रिक प्रक्रिया? चौकशीची नागरिकांची मागणी. फलटण (जि. सातारा): फलटण शहर…
जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद; मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा हस्तगत
पुणे, :बिबवेवाडी पोलीसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला…
बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट; कायदे, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम व व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन
जनहित प्रतिष्ठानच्या १०५ विद्यार्थ्यांनी घेतला पोलीस कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव; ‘गुड टच-बॅड टच’, व्यसनमुक्ती व सुजाण…
जबरी चोरी प्रकरणातील तीन आरोपी जेरबंद; मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा हस्तगत
पुणे, :बिबवेवाडी पोलीसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास गुरुगौतम मुनी हॉस्पिटलसमोर, बिबवेवाडी येथे फिर्यादी हे रिक्षातून जात असताना दोन पांढऱ्या रंगाच्या दुचाकींवरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांची रिक्षा अडवून त्यांना जबरदस्तीने बाहेर ओढले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम व रिक्षा जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), १२६(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा […]
बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट; कायदे, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम व व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन
जनहित प्रतिष्ठानच्या १०५ विद्यार्थ्यांनी घेतला पोलीस कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव; ‘गुड टच-बॅड टच’, व्यसनमुक्ती व सुजाण नागरिकत्वावर विशेष जनजागृती बारामती, दि. ९ जून २०२६ (प्रतिनिधी): बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आज जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयातील १०५ विद्यार्थी व १० शिक्षकांनी शैक्षणिक भेट देत पोलीस विभागाच्या विविध कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. दुपारी २ ते ३ या वेळेत झालेल्या या प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमात विद्यार्थ्यांना कायदेविषयक जागरूकता, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम, बाल संरक्षण, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास आणि सुजाण नागरिकत्व या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पोलीस विभागाची कार्यपद्धती समजावून सांगणे, पोलिसांविषयी असलेला अनाठायी धाक दूर करणे, कायद्याबद्दल आदर […]
माळेगाव दारुड्यांचे माहेरघर बनले आहे का? गावठी दारूच्या अड्ड्यांना कोणाचे अभय?
माळेगावात गावठी दारूचा सुळसुळाट? अवैधदारू.विक्रीवरकायमस्वरूपी आळा कधी बसणार? माळेगाव (बारामती तालुका प्रतिनिधी)बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात गावठी दारू विक्री आणि अवैध मद्यधंद्यांबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. माळेगाव हे दारुड्यांचे माहेरघर बनत चालले आहे का? गावातील काही भागांमध्ये गावठी दारूची विक्री आणि सेवन खुलेआम सुरू असल्याची चर्चा नेमकी कितपत खरी आहे? याची सखोल चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. गावातील चौक, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे का? यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे का? गावातील सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे […]
माळेगावात अवैध धंदे सुरूच? पोलीसांच्या विशेष मोहिमेनंतरही दारू, मटका, जुगार व गुटखा विक्रीवर पूर्णविराम कधी?
अवैध कारवायांविरोधात कडक भूमिकेची घोषणा; नागरिकांचा सवाल – कारवाईची गती आणि परिणाम कितपत दिसणार? माळेगाव (बारामती तालुका प्रतिनिधी): माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे, पत्त्यांचे क्लब, गुटखा विक्री तसेच इतर बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, परिसरातील काही नागरिकांकडून अवैध धंद्यांबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने या कारवायांवर प्रत्यक्ष आणि कायमस्वरूपी आळा कधी बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबल्याचे सांगितले असले, तरी या मोहिमेचे परिणाम आगामी काळात […]
पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट? सुपारी देऊन चारचाकीने धडक; कराडमधील धक्कादायक प्रकार उघड
कराड | प्रतिनिधी कराड शहरात एका सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूमागे अपघात नसून नियोजित हत्येचा कट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकारी लक्ष्मण शिरंग मंडले (वय 54, रा. मनवे, ता. कराड) यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीसह अन्य आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले हे यापूर्वी कराड परिसरात पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली ठाणे येथे जलसंपदा विभागात अधिकारी म्हणून झाली होती. 6 जून रोजी पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान ते ठाण्यावरून कराड येथे आले होते. यावेळी यशवंत हॉलसमोर त्यांच्या पाठीमागून भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक […]
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ‘अधिक मास सिल्व्हर ऑफर’ जाहीर; सिल्व्हर वस्तूंवर मेकिंग चार्जेसमध्ये ३०% सूट
बारामती : जगातील आघाडीचे ज्वेलरी रिटेलर आणि विश्वास व जबाबदारीचे प्रतीक असलेले मलाबार गोल्ड अँड डायमंड्स यांनी महाराष्ट्रातील निवडक शोरूम्समध्ये ‘अधिक मास’ या शुभ कालखंडानिमित्त खास मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेत अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व साजरे केले जाणार आहे. ही खास मोहीम 17 मे ते 15 जून 2026 दरम्यान महाराष्ट्रातील 23 निवडक मलाबार गोल्ड अँड डायमंड्स शोरूम्समध्ये उपलब्ध असेल. ‘अधिक मास ऑफर’ अंतर्गत ग्राहकांना सर्व सिल्व्हर वस्तूंवर मेकिंग चार्जेसमध्ये सरळ 30% सूट मिळणार आहे. महाराष्ट्राच्या परंपरांमध्ये खोलवर रुजलेला ‘अधिक मास’ हा अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा कालखंड मानला जातो. या काळात चांदीची खरेदी शुभ मानली जाते आणि ती भक्ती, समृद्धी व […]
दोन गावठी बनावटीचे कट्टे व काडतुसे जप्त करून आरोपीस केले जेरबंद
सुंदरनगर, मांगडेवाडी परिसरात कारवाई; १.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त, आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल पुणे -: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना अंमलदार मितेश चोरमाले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे एक इसम अग्निशस्त्र घेऊन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. तत्काळ नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज, पुणे येथे जाऊन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता सदर ठिकाणावरील गुरुदत्त मित्र मंडळाचे मंदिरालगतचे मोकळ्या जागेमध्ये इसम नामे सोहम गोविंद धुमाळ, वय १८ वर्षे ७ महिने, रा. […]
पुणे जिल्हातील भोंदू बाबांचे साम्राज्य उद्ध्वस्त होणार का ? सोशल मीडियावर गांजा ओढतानाचे व्हिडिओ व्हायरल करणारे तथाकथित साधू गांजा समर्थक आहेत का?
“अंधश्रद्धेच्या आडून लूटमार, महिलांचे शोषण आणि अमली पदार्थांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; कायद्याचे राज्य सर्वांसाठी समान असावे.” पुणे -: अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट, अत्याचार आणि अमली पदार्थांच्या जाळ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी; भोंदूगिरी, अघोरी प्रथा आणि व्यसन संस्कृतीला संरक्षण मिळते आहे का? महाराष्ट्रात तसेच पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांमध्ये स्वतःला चमत्कारी, तांत्रिक, सिद्धपुरुष अथवा आध्यात्मिक गुरु म्हणून सादर करणाऱ्या काही कथित भोंदू बाबांविरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार, ग्रहदोष निवारण, करणी उतरविणे, आर्थिक संकट दूर करणे, प्रेमसंबंध जुळवून देणे, व्यवसायात यश मिळवून देणे अशा विविध आमिषांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तसेच महिलांवर […]
१५ नॉन-बेलेबल वॉरंटधारक फरार आरोपी ‘पोक्या’ अखेर बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात
नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न; दीड तासांच्या थरारक शोधमोहीमेनंतर अटक, न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली. बारामती : तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) याला बारामती शहर पोलिसांनी धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत अटक केली. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देणारा हा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांना २४ मे २०२६ रोजी सकाळी गोपनीय माहिती मिळाली की, शंकर उर्फ पोक्या आडके हा दशविधी कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती मिळताच पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे […]

